'आंबेडकर माझे आदर्श, मी काही ब्राह्मण नाही' 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

दलित कलाकारांविषयी रिचानं काही वादग्रस्त वक्तव्ये केली असा समज करुन एका नेटक-याने तिच्यावर टीका केली होती. 

मुंबई - बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असण्यामुळे चर्चेत राहतात. त्यांची नावे सांगायची झाल्यास कंगणा राणावत, स्वरा भास्कर, तापसी पन्नु आणि रिचा चढ्ढा. या अभिनेत्री आपल्या परखड भूमिकेसाठी ओळखल्या जातात. समाजात जे काही घडते आहे त्यावर आपण व्यक्त झाले पाहिजे अशा मानसिकतेतून त्या सतत व्यक्त होत असतात. रिचावर गेल्या काही दिवसांपूर्वी एक गंभीर आरोप झाला होता. त्यावर आरोप करणा-याला तिनं जशास तसे उत्तर दिले आहे.

दलित कलाकारांविषयी रिचानं काही वादग्रस्त वक्तव्ये केली असा समज करुन एका नेटक-याने तिच्यावर टीका केली होती. आणि तिच्या भूमिकेविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर रिचानं त्याला प्रत्युत्तर दिले आहे. एका आंबेडकरवादी व्टिटर हँडलच्या युझर्सनं रिचावर असे आरोप केले होते की, रिचानं दलित कलाकारांना मेरिटलेस असे संबोधले होते. तसेच तिनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र असलेले जे टी शर्ट घातले होते. ते केवळ पैशांसाठी होते. त्यामागील उद्देश समजावून घेणे गरजेचे आहे. तिच्यात ब्राह्मणवाद भरला आहे. असे व्टिट त्या युझर्सनं केलं आहे.

आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करताना रिचानं म्हटले आहे की, मी कधीही कुठल्याही प्रकारचे वक्तव्य केलेलं नाही. जे काही माझ्याविरोधात सांगितले गेले आहे ते एक लजास्पद आणि खोटे आहे. आंबेडकर माझे आदर्श आहेत. प्रेरणास्थान आहेत त्यांचे छायाचित्र असलेलं टी शर्ट घालणं हा माझा अधिकार आहे. रिचाच्या या व्टिटवर मोठ्या संख्येनं नेटक-यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात रिच्यावर त्यांनी टीकाही केली आहे. त्यामुळे रिचा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा रिचाचा मॅडम चीफ मिनिस्टर नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून तिच्याविरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार होत असल्याचे बोलले जात आहे.

 'मी पण हिंदू, तांडव पाहून अपमानित झाले नाही'

रिचाला तिच्या वक्ततव्यावरुन धमक्याही येत असल्याचे सांगितले जात आहे. एका नेत्यानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रिचाची जीभ कापणा-याला त्यांनी बक्षीस जाहिर केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्या काही कलाकृती प्रसिध्द होत आहे त्यावरुन मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Richa Chadha said Ambedkar my idol I am not brahmin reaction allegations of fake statement