
लग्नानंतर आनंदी आयुष्य प्रत्येकाला हवे असते, पण काही लोकांच्या इच्छा अपूर्ण राहतात. यामध्ये कधी पतीची कमतरता असते तर कधी पत्नीची काही कमतरता असते. कर्नाटकातून असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे लग्नाच्या सात वर्षानंतरही पत्नीने पतीला हात लावू दिला नाही. लग्नाला इतकी वर्षे झाली तरी लग्नाची रात्र पत्नीला मान्य नव्हती. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पतीपासून दूर जात होती. यानंतर पतीने न्यायालयात धाव घेत पत्नीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.