
देशातील प्रसिद्ध राजा हत्याकांडासारखाच एक प्रकार राजस्थानातील अलवर येथील खेडली येथून समोर आला आहे. ८ जूनच्या रात्री खेडलीच्या बायपासवर वीरू जाटव नावाचा एक तरुण घरी मृतावस्थेत आढळला. या प्रकरणात पोलिसांनी वीरूची पत्नी अनिता, तिचा प्रियकर आणि आणखी एका तरुणाला अटक केली आहे.