Crime News : 'उद्या मुलाचं तोंड पाहू शकणार नाहीस...' पत्नीने दिली धमकी; पतीने व्हिडिओ कॉलवरच संपविले जीवन
Uttar Pradesh Crime News : गुरुवारी पती आपल्या पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. यावेळी पत्नीला पटवून देण्यात अयशस्वी झाल्यामुळे तो संतापला आणि स्वत:चा गळा कापला. तो एवढ्यावरच थांबला नाही पोटावर आणि छातीवर वार करुन घेतले.
पती-पत्नीमधील वाद इतके टोकाला जातात की, यातून कधी-कधी भयंकर घडतं. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये घडला आहे. एका तरुणाने पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच गळा कापून जीवन संपविले.