Bageshwar Dham : जया किशोरी धीरेंद्र बाबासोबत लग्न करणार का? खुद्द शास्त्रींनी दिलं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Dham

Bageshwar Dham : जया किशोरी धीरेंद्र बाबासोबत लग्न करणार का? खुद्द शास्त्रींनी दिलं स्पष्टीकरण

Bageshwar Dham Dheerendra kushna shashtri News

मध्य प्रदेशातल्या छतरपूर इथल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री देशभरात चर्चेत आहेत. ते मनातली गोष्ट ओळखतात आणि चमत्कार करतात, असा दावा करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना चॅलेंज केलं आहे.

यातच प्रसिद्ध कृष्णकथाकार जया किशोरी आणि बागेश्वर महाराज लग्न करणार का? असा प्रश्न सध्या देशभरात उपस्थित होतोय. एका मुलाखतीमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज आणि जया किशोरी यांच्या लग्नाच्या बातमीमध्ये किती सत्य आहे? ते माहिती नाही. परंतु धीरेंद्र शास्त्रींनी ही बातमी फेटाळून लावली होती. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे सगळं खोटं असल्याचं नमूद केलेलं.

हेही वाचा: Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त; मोदींना दिलेल्या पत्रात 'हे' सांगितलं कारण

'या सगळ्या अफवा आहेत. माझा असा कुठलाही विचार नाही' असं बागेश्वर शास्त्री म्हणाले होते. जया किशोरी यांनीसुद्धा ही माहिती आपल्या फेसबुकवर शेअर केली होती.

अफवा पसरविणाऱ्यांवर अॅक्शन घेणार

या अफवांमुळे मी खूप व्याकूळ आहे. मी माझं म्हणणं लेखी स्वरुपामध्ये दिलेलं आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. जेव्हा नाव मोठं होतं तेव्हा बदनामी होतच असते, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

आता पुन्हा बागेश्वर बाबा चर्चेत आल्याने त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठवल्या जात आहेत. दोघांकडूनही या अफवा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे.

टॅग्स :Uttar Pradesh