
नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेत स्वतःचे पुनर्वसन करून घेण्याच्या तयारीत चालविल्याची चर्चा आहे. पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आलेले अब्जाधीश उद्योगपती संजीव अरोरा यांची आम आदमी पक्षाने लुधियाना-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी जाहीर केल्यामुळे चर्चा सुरु झाली. मात्र, या शक्यतेचे ‘आप’ने खंडन केले आहे.