अभिनंदन यांना वीरचक्र, तर प्रकाश जाधवांना किर्ती चक्र

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारकडून लष्करातील पुरस्कांची घोषणा करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या 'एफ-16' विमानाबरोबर झालेल्या हवाई युद्धात 'मिग-21'मधून बाहेर पडताना विंग कमांडर वर्धमान जखमी झाले होते.

नवी दिल्ली : बालाकोट कारवाईनंतर पाकिस्तानचे विमान पाडणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र, तर बेळगावचे भारतीय लष्करातील जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कित्ती चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारकडून लष्करातील पुरस्कांची घोषणा करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या 'एफ-16' विमानाबरोबर झालेल्या हवाई युद्धात 'मिग-21'मधून बाहेर पडताना विंग कमांडर वर्धमान जखमी झाले होते. ते पाकिस्तानच्या ताब्यात असताना भारताने त्यांना सोडावून आणले होते. त्यांच्या कामगिरीचे देशभर कौतुक करण्यात आले होते. आता त्यांच्या या शौर्याची दखल घेत सरकारने त्यांना वीर चक्राने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अभिनंदन यांच्यासह 1 राष्ट्रीय रायफल्सचे हुतात्मा जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात येणार आहे. तसेच लष्करातील आठ जवांना शौर्य चक्र दिले जाणार आहे. त्यातील पाच जणांना शौर्य चक्र मरणोत्तर दिले जाईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wing Commander Abhinandan Varthaman to be conferred with Vir Chakra on Independence Day