विंग कमांडरने अमित शहांच्या नावाने केला राज्यपालांना फोन, कशासाठी?

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

मध्य प्रदेश पोलिसांनी या विंग कमांडरसह त्याच्या डॉक्टरला अटक केली आहे. विंग कमांडरने एका विश्वविद्यालयाचा कुलगुरू म्हणून आपल्या डॉक्टर मित्राची निवड करावी, यासाठी मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या निवासस्थानी अमित शहांच्या नावाने फोन केला.

भोपाळ : भारतीय हवाई दलातील विंग कमांडरने आपल्या मित्राला कुलगुरु बनविण्यासाठी राज्यपालांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने फोन केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्य प्रदेश पोलिसांनी या विंग कमांडरसह त्याच्या डॉक्टरला अटक केली आहे. विंग कमांडरने एका विश्वविद्यालयाचा कुलगुरू म्हणून आपल्या डॉक्टर मित्राची निवड करावी, यासाठी मध्य प्रदेशच्या राज्यपालांच्या निवासस्थानी अमित शहांच्या नावाने फोन केला. राज्यपाल निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना या फोनमध्ये गडबड वाटली, तसेच अमित शहांकडून असे फोन येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी मध्य प्रदेश एसटीएफने विंग कमांडर व त्याचा मित्र डॉ. चंद्रेश कुमार यांना अटक केली.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

एसटीएफचे पोलिस अधिकारी अशोक अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश आयुर्विज्ञान विश्वविद्यालयाचा कुलगुरूची निवड होणार आहे. यासाठी डॉ. शुक्ला यांनी विंग कमांडर असलेल्या कुलदीप वाघेला यांना याबाबत माहिती दिली. तसेच कुलगुरू होण्यासाठी मोठ्या नावाची राज्यपालांकडे शिफारस करण्याची गरज असल्याचेही सांगितले. त्यानंतर वाघेला यांनी राज्यपालांना फोन करून शिफारस केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wing Commander Arrested for Posing as Amit Shah in Phone Call to MP Governor