PM Modi: 'तुम्हालाही आहे गोल्डन संधी'; पंतप्रधान मोदींनी अधिवेशनाआधी विरोधकांना दिला लाखमोलाचा सल्ला

हिवाळी अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन सादर केले. यावेळी मोदी यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे.
PM Modi
PM Modi

नवी दिल्ली- हिवाळी अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन सादर केले. यावेळी मोदी यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. तुम्हालाही संधी आहे. पण, तुम्ही नकारात्मकता सोडून द्या. विकासाच्या कामात सोबत या. देशाला चांगल्या विरोधकांची देखील आवश्यकता आहे, असं मोदी म्हणाले.

देशाने नकारात्मकतेला नाकारलं आहे. आम्ही अधिवेशनाच्या सुरुवातील विरोधकांशी चर्चा केली. मिळून एकत्र पुढे जाण्यासाठी आम्ही आग्रही असतो. यावेळीही ही प्रक्रिया पार पडली आहे. (winter session of parliament started pm narendra modi advice to opposition congress)

PM Modi
PM Modi: नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करतील ! खासदार विखेंनी दर्शवला विश्वास, नगरमध्ये साजरा केला जल्लोष

लाखमोलाचा सल्ला

माझी खासदारांना विनंती आहे की, लोकशाहीचे मंदिर जन आकाक्षांसाठी, विकसित भारताला अधिक मजबूत बनवण्यासाठी एक मंच आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी तयारी करुन संसदेत यावं. विधेयकावर चर्चा व्हावी. चांगल्या सूचना याव्यात. खासदाराला जमिनी परिस्थिती माहिती असते. त्यामुळे तो चांगला मुद्दा मांडू शकतो. पण, जर चर्चाच झाली नाही तर देश काही गोष्टींना मुकतो. त्यामुळे माझी विनंती आहे त्यांनी संसदेत गोंधळ घालू नये, असं ते म्हणाले.

वर्तमान निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्भूमीवर मी सांगतो की विरोधकांना ही गोल्डन संधी आहे. अधिवेशनात पराजयाचा थयथयाट करण्यापेक्षा त्यांनी पराजयातून शिकून गेल्या ९ वर्षांपासून आलेली नकारात्मकता सोडून सकारात्मतेची कास धरावी. तेव्हा देशाच्या जनतेचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलेल. त्यांच्यासाठी नवीन द्वार उघडेल. विरोधात असूनही मी त्यांना एक चांगला सल्ला देत आहे, असं मोदी म्हणाले.

विरोधकांनी सकारात्मक विचार घेऊन यावं, आम्ही १० पाऊलं चाललोय तर तुम्ही १२ पाऊलं चालून या. सगळ्यांचे भविष्य उज्वल आहे. निराश होऊ नका. पण, कृपया बाहेरच्या पराजयाचा राग अधिवेशनात दाखवू नका, निराशा नक्की येते. तुमच्या साथीदारांना धीर देण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, पण किमान लोकशाहीच्या या मंदिराला गोंधळाचे व्यासपीठ बनवू नका, अशी विनंती त्यांनी केली.

PM Modi
Narendra Modi : ''आतातरी सुधरा नाहीतर जनता तुम्हाला संपवून टाकेल'' विजयी सभेत नरेंद्र मोदी कडाडले

दृष्टीकोण बदला

माझ्या दीर्घ अनुभवाववरुन सांगतोय. तुम्ही काही प्रमाणात तुमचा दृष्टीकोण बदला. विरोध करायचा म्हणून विरोध करु नका. देशातील सकारात्मक गोष्टीसाठी साथ द्या. मतभेद असेल तर चर्चा करुया. देशाच्या मनात काही गोष्टींवरुन द्वेष निर्माण झालाय. त्यामुळे सोबत या, द्वेष प्रेमात बदलेल. तुमची प्रतिमा द्वेष आणि नकारात्मकेची होणे देशाच्या लोकशाहीसाठी चांगलं नाही. देशात विरोधक सामर्थ्यवान आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com