Winter Tourism: ऑल वेदर रोडमुळे उत्तराखंडच्या हिवाळी पर्यटनाला बळ; चारधाम यात्रा संपली, तरी पर्यटकांचा ओघ सुरूच

Winter Tourism Uttarakhand : चारधाम यात्रा हंगाम संपल्यानंतरही उत्तराखंडमध्ये धार्मिक स्थळे आणि बर्फाच्छादित पर्यटनस्थळांमुळे पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग ऑल वेदर रोडमुळे हिवाळी पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
The Rishikesh–Karnaprayag All Weather Road is expected to support winter tourism in Uttarakhand.

The Rishikesh–Karnaprayag All Weather Road is expected to support winter tourism in Uttarakhand.

esakal

Updated on: 

उत्तराखंड: उत्तराखंडमधील चारधाम यात्रा हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात असताना ऋषिकेश ते कर्णप्रयाग राष्ट्रीय महामार्गावरील ऑल वेदर रोड प्रकल्पामुळे हिवाळी पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यानंतर या मार्गाची पाहणी करण्यात आली असता, बहुतांश भागांत वाहतूक सुरळीत असल्याचे समोर आले. मात्र, श्रीनगरजवळील फरासू परिसरात डोंगर स्थिर करण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी वाहतूक नियंत्रित पद्धतीने सोडली जात आहे.

चारधाम यात्रा संपल्यानंतरही धार्मिक स्थळे, बर्फाच्छादित पर्यटनस्थळे आणि हिवाळी पूजा-विधींमुळे पर्यटकांची वर्दळ सुरू राहते. त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, ढाबाचालक आणि अन्य लघुव्यावसायिकांना वर्षभर व्यवसाय सुरू ठेवण्याची संधी मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com