बाबा रामदेव यांनी वक्तव्य मागं घ्यावं; आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं

baba ramdev harshverdhan
baba ramdev harshverdhan

नवी दिल्ली- योग गुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी नुकतीच अ‍ॅलोपॅथी (Allopathy) उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आक्रमक झाली आहे. आएमएने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Harshwardhan) यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्याची मागणी केली होती. वाढत्या दबावानंतर आरोग्यमंत्र्यांनी याप्रकरणात हस्तक्षेप केला असून बाबा रामदेव यांना आपलं वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं आहे. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Withdraw Objectionable Remarks On Allopathy Doctors Health Minister Harshwardhan To Baba Ramdev)

देशातील नागरिक बाब रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवरील वक्तव्यामुळे दु:खी झाले आहेत. मी त्यांना याआधीच फोनवरुन याबाबत सांगितलं आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे रुग्णांसाठी देवासमान आहेत. कोरोनाच्या भयंकर स्थितीत ते पुढे येऊन काम करत आहेत, असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.

baba ramdev harshverdhan
'पुणे स्मार्ट सिटी'च्या माफीनंतर शिवसेना नेत्यांचा राग शांत

सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपाचर पद्धतीविरोधात बोलताना दिसले. कोविड-१९ महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत, असं ते म्हणाले होते.

baba ramdev harshverdhan
जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशात कोरोना का वाढतोय?

बाबा रामदेव यांच्या या वक्तव्याची गंभीर देखल IMA नं घेतली. याबाबत एक प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये कथीत व्हिडिओत बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या आरोपांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्विकार करावा आणि देशातील या आधुनिक चिकित्सापद्धतीचा भंग करावा किंवा बाबा रामदेव यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच IMA ने मानहाणीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांना सुनावलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com