"दहशतवाद, तापमानवाढ, लोकसंख्यावाढ यांवर भारताशिवाय तोडगा अशक्य" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Walter Lindner

"भारताशिवाय दहशतवाद, तापमानवाढ, लोकसंख्यावाढ यांवर तोडगा अशक्य"

नवी दिल्ली : या ग्रहावरील १.४ अब्ज लोकसंख्येत प्रत्येक पाचवी व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळं आपल्याला जे काही कारायचं आहे ते जागतीक दृष्टीकोनातून करावं लागेल. त्यासाठी दहशतवाद, ग्लोबल वॉर्मिंग, लोकसंख्यावाढ, पर्यावरण बदल या समस्यांवर भारताशिवाय तोडगा काढणं शक्य नाही, असं मत भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी व्यक्त केलं आहे.

जागतिक दहशवादावर बोलताना लिंडनर म्हणाले, "भारताला वाटत असलेली भीती आम्ही यापूर्वीच व्यक्त केली आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाला तालिबानच्या विजयामुळं प्रोत्साहन मिळणार आहे. आपल्या सर्वांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे" भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा वापर करण्याबाबत बोलताना लिंडनर म्हणाले, "तालिबानसोबत आमची या अटीकवर चर्चा झाली की, यापुढे आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खतपाणी घातलं जाणार नाही. मग ते शेजारील देश पाकिस्तान असो वा अफगाणिस्तान"

"जगाला लस पुरवणाऱ्या COVAX योजनेवर आम्ही पैसे गुंतवतो आणि भारतासारखी राष्ट्रे उत्पादन करतात. पण आता तुम्ही बौद्धिक संपदा संरक्षण काढून घेतल्यास शास्त्रज्ञ, संशोधकांना कामासाठी प्रेरित करणे कठीण आहे. COVAX विनामूल्य आहे, त्यामुळे आम्ही प्रोत्साहनांना अनुकूल आहोत," असंही लिंडनर पुढे म्हणाले.

Web Title: Without India Impossible Solution On Terrorism German Envoy Walter J Lindner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news
go to top