नवरा कॉलेजमध्ये असताना सासऱ्याने बलात्कार केला, सूनेची पोलिसात तक्रार | Madhya pradesh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

नवरा कॉलेजमध्ये असताना सासऱ्याने बलात्कार केला, सूनेची पोलिसात तक्रार

sakal_logo
By
दीनानाथ परब

भोपाळ: सून आणि सासरा (Father-in-law) हे पवित्र नातं आहे. पण या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. सूनेवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली सासऱ्याविरोधात गुना (Guna) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने गुना जिल्ह्यातील म्याना पोलीस (Myana police) ठाण्यात जाऊन सासऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

नवरा कॉलेजमध्ये असताना, सासऱ्याने माझ्यावर बलात्कार केला. आता तो मला जीवे मारण्याची धमकी देतोय असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिला २१ वर्षांची असून ती राजस्थानची आहे. तिचे गुना येथे राहणाऱ्या २२ वर्षाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. महिलेचा नवरा शिक्षण घेत आहे. तो बारावीत आहे. नवराही पीडित महिलेसोबत तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: नाशिक हादरलं, भाजपा मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहिताीनुसार, पीडित महिलेचा नवरा बारावीत आहे. दररोज तो गावाकडून कॉलेजमध्ये जातो. "नवरा कॉलेजमध्ये असताना सासऱ्याने आपल्यावर बलात्कार केला. या बद्दल कुठे वाच्यता केली, तर सासऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली. सासऱ्याकडे अनेक बेकायद शस्त्रास्त्र असून कुटुंबीयांना धमकावण्यासाठी ते अनेकदा या शस्त्रांचा वापर करतात" असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: 'झिम्मा'चे खेळ हाऊसफुल्ल! चित्रपट ठरतोय सुपरहिट

आपल्या सासऱ्याने कुटुंबातील दुसऱ्या एका महिलेवरही बलात्कार करुन तोंड बंद ठेवण्यासाठी तिला धमकावले असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. पण संशयिताला अजून अटक केलेली नाही. "तक्रारीच्या आधारावर आम्ही बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे आणि अन्य आरोपांचीही चौकशी करतोय" असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार महिलेचे वडिल राजस्थानातील एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. पत्नीला साथ दिली तर वडिल आपल्याला जीवे मारु शकतात, असे पीडित महिलेच्या पतीने म्हटले आहे.

loading image
go to top