'झिम्मा'चे खेळ हाऊसफुल्ल! चित्रपट ठरतोय सुपरहिट| Jhimma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhimma

'झिम्मा'चे खेळ हाऊसफुल्ल! चित्रपट ठरतोय सुपरहिट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा' Jhimma हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. वीकेंडला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर 'झिम्मा'चे प्री बुकिंगही जोरदार झाले. विशेष म्हणजे विकेंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे १८ शोज लागले होते आणि तेसुद्धा सगळे हाऊसफुल्ल झाले. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

'झिम्मा' चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, '' सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत.’’

loading image
go to top