esakal | पुण्यातील तीन गावांचा प्रश्न, अजित पवार-बाळासाहेब थोरात यांची आज महत्त्वाची बैठक | Ajit pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

पुण्यातील तीन गावांचा प्रश्न, अजित पवार-थोरातांमध्ये महत्त्वाची बैठक

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) तीन गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. संध्याकाळी ४.३० वाजता ही बैठक होईल.

मौजे कोंढरी, घटके,धानवली गावांचे काममस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील या तिन्ही गावांना भूस्खलनाची भीती आहे. माळीण आणि तळीये सारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. माळीण आणि यावर्षी तळीये गाव भूस्खलन आणि दरड कोसळल्यामुळे उद्धवस्त झालं होतं.

हेही वाचा: कॉन्ट्रॅक्टर्सवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे का? राणेंचा सवाल

महाडमध्ये झालेल्या प्रलयकारी पावसामुळं तळीये गावात दरड कोसळून त्यात ८५ जणांचा मृत्यू झाला तर अखं गावचं या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पूनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचं देखील लवकरात लवकर पूनर्वसन करण्याची मागणी होत होती.

loading image
go to top