
सूनेची चिमुकल्या नातीसह आत्महत्या, सासूचा आत्महत्येचा प्रयत्न
सुरत : सूनने नातीसोबत आत्महत्या केल्याचे कळताच सासूने देखील गळफास लावून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील (Gujrat) दिंडोळी येथे ही घटना घडली असून विमल दिवे असं सासूचं नाव आहे. तसेच मृत सून महाराष्ट्रातील (Maharashtra) बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी होती.
हेही वाचा: कर्जाचा चढता डोंगरमुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
विमल दिवे या आपला मुलगा सागर, सून दीपाली (२८) आणि नात (१८ महिने) यांच्यासोबत दिंडोळीतील प्रयोशा सोसायटीत राहत होत्या. सून दीपाली ही महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी होती. तसेच तिचा पती इलेक्ट्रीकचा कंत्राटदार होता. दीपालीने आपल्या १८ महिन्याच्या चिमुकलीसोबत शुक्रवारी घर सोडलं. ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. दोघींचा मृतदेह सापडल्याचे सोमवारी कुटुंबीयांना समजले. आपल्या नातीचा आणि सूनेचा मृतदेह दयालजी बाग येथील नदीत तरंगत असल्याचे समजल्यानंतर विमल या नैराश्यात गेल्या होत्या. कुटुंबातील सर्वजण मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयात जाण्याची तयारी करत होते. त्यावेळी विमल या पहिल्या माळ्यावरील आपल्या खोलीत गेल्या आणि ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात जाण्यासाठी कुटुंबीयांनी हाक मारली. पण, खोलीतून कुठलाच आवाज येत नव्हता. त्यामुळे पहिल्या माळ्यावर जाऊन बघितले असता तिची खोली आतून बंद होती. त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडल्यावर विमल या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं.
Web Title: Woman Attempted Suicide As Know Daughter In Law Commited Suicide Surat Gujrat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..