

Uttar Pradesh Crime
ESakal
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबातील मुलांच्या भांडणातून मोठ्यामध्ये वाद झाला, मात्र अवघ्या क्षणात या वादाने हिंसक वळण घेतले आहे. ज्यामध्ये एका महिलेने तिच्या दीराच्या गुप्तांगाला चावा घेतल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत पीडित व्यक्ती जखमी झाला असून त्याला ५५ टाके पडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ पसरली आहे.