
मेघालयात हनीमूनला गेल्यानंतर हत्या झालेल्या राजा रघुवंशीच्या कुटुंबात आता नवं संकट उभा राहिलं आहे. राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशीची पत्नी असल्याचा दावा एका महिलेनं केलाय. सचिन माझ्या अपत्याचा बाप असल्याचं महिलेनं सांगितलं असून तिनं एक डीएनए रिपोर्टसुद्धा सर्वांना दाखवला. महिलेच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे.