हृदयद्रावक ! चार दिवसांपूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या महिला पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

Woman constable dies of coronavirus 4 days after giving birth to baby
Woman constable dies of coronavirus 4 days after giving birth to baby
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या महिला पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात महिला पोलिस कर्मचारी कोरोना संक्रमित झाली. त्यानंतर या महिला पोलिसाचा मृत्यू झाला. दरम्यान या महिला पोलिस कर्मचाऱ्याने चार दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता.

महिला पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना तपासणीसाठी सॅम्पल घेतले होते. मात्र, रिपोर्ट येण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत्यूनंतर या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. महिला पोलिस कर्मचारी कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर पोलिस ठाण्यात कार्यरथ होती. ती प्रेग्नंट असल्याने तिने ५ एप्रिलपर्यंत सुट्टी घेतली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनंतर या महिला पोलिस कर्मचाऱ्याची तब्ब्येत अचानक बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयाने उपचार करण्यात नकार दिला. त्यानंतर तिचा दुपारी मृत्यू झाला.

दिलासादायक ! लॉकडाऊनमध्ये 'या' कार निर्माता कंपनीने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, नोएडा -२ एसीपी रजनीश यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. 'माझ्या जवळ शब्द नाहीत, या कोरोना योद्धासाठी. एक लहान मुलगा आणि दुसरे बाळ पाच दिवसांचे आहे. कोरोनाची लढाई लढताना या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे होणे एक दुखद घटना आहे. माझ्याजवळ शब्द नाही, मी निशब्द आहे.! अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com