सोळाव्या बाळाला जन्म देऊन, आईनं सोडला जीव; बाळाचाही मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

मध्य प्रदेशातील एका 45 वर्षीय महिलेचा 16 व्या बाळाला जन्म देताना मृत्यू झाला आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशातील एका 45 वर्षीय महिलेचा 16 व्या बाळाला जन्म देताना मृत्यू झाला आहे. डामोह जिल्ह्यातील ही घटना असून आई आणि बाळ दोघांची प्राणज्योत मावळली आहे. स्थानिक आरोग्य कार्यकर्तीने ही माहिती दिली आहे. 

पाडाझिर गावातील सुख्रानी अहिरवाल या महिलेने शनिवारी एका मुलाला जन्म दिला, असं कालो बाई विश्वकर्मा या आशा कार्यकर्तीने Social Health Activist (ASHA) सांगितले. काही वेळात आई आणि मुलाची प्रकृती बिघडत गेली, त्यानंतर त्यांना जवळच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

कालो बाई यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने आतापर्यंत 15 मुलांना जन्म दिला आहे. त्यातील 7 मुलांचा याआधी मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता त्रिवेद यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies after giving birth to 16th child newborn dead too