

Ahmedabad Woman Doctor Slaps Father Who Came for Daughter’s Treatment Video Goes Viral
Esakal
Viral Video: अहमदाबादमधील एक महिला डॉक्टर रुग्णाच्या वडिलांना कानशिलात लगावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मी तुमच्या मुलावर उपचार करणार नाही, तुम्ही माझ्याशी गैरवर्तन करताय असं महिला डॉक्टर म्हणताना दिसते. यावेळी ती सुरक्षा रक्षकावरही भडकली. तुम्ही काम करत नाही असं सुरक्षा रक्षकाला म्हणते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिला डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी होतेय.