'मुलांनो इकडं पाहू नका' असं म्हणत ती सुरु झाली ड्रायव्हरसोबतच...

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान या महिलेचे तिच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध असल्याचे पुरावे तिच्याच मुलांनी सादर केले.

बंगळूर : बंगळूरमध्ये एका महिलेचे आपल्या ड्रायव्हरसोबतच अफेयर केले. इतकेच नाही तर त्या महिलेने आपल्या मुलांसमोर ड्रायव्हरला किस केले. जेव्हा महिलेने पाहिले की तिची मुले तिच्याकडे पाहत आहेत, तेव्हा ती म्हणाली, माझ्याकडे पाहू नका. आपले काम करा. या महिलेच्या नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावण्यासाठी महिलेने कोर्टाला अपील केले, पण आता कोर्टाने महिलेचे अपील फेटाळले आहे.

या मुलांच्या वडिलांनी महिलेपासून घटस्फोटाची मागणी केली आहे. मुलांनाही वडिलांसह राहायचे आहे, कारण त्यांना आपल्या आईसोबत भविष्य नाही. घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान या महिलेचे तिच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध असल्याचे पुरावे तिच्याच मुलांनी सादर केले.

हेही वाचा - कारमध्येच रंगली वाढदिवसाची पार्टी; पोलिसांनी उतरविली 'झिंग'

कोर्टाने हे पुरावे पाहिल्यानंतर पी. बी. बजंत्री आणि नटराज रंगस्वामी यांनी नंतर सांगितले की ही महिला खूप निर्दयी आहे. या महिलेच्या वागण्यामुळे एक आनंदी कुटुंब नष्ट झाले आहे. या महिलेने तिच्या आनंदासाठी आपल्या मुलांचा देखील विचार केलेला दिसत नाही.

हे प्रकरण 2013 पासून न्यायालयात चालले होते. पण जेव्हा मुलांनी त्या महिलेलाड्रायव्हरला किस करताना बघितले आणि कोर्टात पुरावा सादर केला तेव्हा कोर्टाने या महिलेचे सर्व दावे फेटाळून लावले.

अधिक वाचा - 'ते' शेतात चारा कापत होते अन्‌ अचानक घडले असे... 

या मुलांनी कोर्टात सांगितले की त्यांची आई  प्रथम त्यांना आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेली. त्यांच्यासोबत तिचा प्रियकर ड्रायव्हरही होता. मग त्या महिलेने आपल्या मुलांना सांगितले की तुम्ही जरा दूर बसा. मग त्या महिलेने आणि ड्राय्वहरने एकमेकांना मिठी मारली आणि बराच वेळ एकमेकांना किस करत राहिले. मग ती महिला आपल्या मुलांना म्हणाली की तुम्ही दोघे तिकडे पाहा आमच्याकडे पाहू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman fall in love with driver caught red handed kissing in bengaluru

टॅग्स