
पतीचा स्पर्म काउंट कमी असल्यानं ती गर्भवती रहावी यासाठी सासरा, दिर यांच्यासह नातेवाईकांनी बळजबरीने शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका ४० वर्षीय महिलेनं सासरा, दिर यांच्यासह नातेवाईकांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. गुजरातमधील वडोदरा इथं घडलेल्या घटनेनं खळबळ उडालीय. महिलेच्या पतीचा स्पर्म काउंट कमी झाल्यानं गर्भवती होण्यासाठी तिच्यावर नात्यातल्याच लोकांकडून अत्याचार केले गेले. गर्भपात झाल्यानंतर महिलेनं नवपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं पतीवरही गंभीर आरोप केले असून खासगी क्षणांचा व्हिडीओसुद्धा काढले. फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं.