
असं म्हणतात की प्रेमाला कशाचंच बंधन नसतं. प्रेमात कधीही, कुठेही आणि कोणाशीही पडू शकते. प्रेम चेहरा किंवा वय पाहिले पाहात नाही, पण काही लोक एकतर्फी प्रेमात इतके वेडे होतात की समोरची व्यक्तीही त्रासून जाते. मध्य प्रदेशातील रतलाम येथून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे दोन मुलांची घटस्फोटित आई एका अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली. तिने एका वर्षापर्यंत मुलाला इतका त्रास दिला की कंटाळून पीडित मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.