पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

Crime News महिलेच्या पतीसह सासऱ्यांवर तिच्या खूनाचे आरोप केले होते. या प्रकरणी पती आणि सासऱ्याला तुरुंगात जावं लागलं. आता १२ वर्षांनी तीच महिला जिवंत सापडली आहे.
Murder Mystery Takes Twist as Woman Found Alive After 12 Years

Murder Mystery Takes Twist as Woman Found Alive After 12 Years

Esakal

Updated on

बिहारच्या रोहतासमध्ये १२ वर्षांपूर्वी एक महिला अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी एका महिलेचा मृतदेह नाल्यात आढळला होता. कुटुंबियांनी मृतदेह पाहून हा आपल्याच मुलीचा असल्याचं सांगितलं. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या पतीसह सासऱ्यांवर आरोप केले होते. या प्रकरणी पती आणि सासऱ्याला तुरुंगात जावं लागलं. कुटुंबातील ८ जणांना खून प्रकरणात आरोपी केलं होतं .अनेक वर्षे तुरुंगवास आणि कोर्टाच्या फेऱ्या मारल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com