esakal | जन्मत:च बाळामध्ये कोरोनाला रोखणाऱ्या अँटीबॉडीज; हे कसं घडलं? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

New-Born-Baby

अशाप्रकारची ही वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच केस असल्याने हा संशोधनाचा विषय आहे

जन्मत:च बाळामध्ये कोरोनाला रोखणाऱ्या अँटीबॉडीज; हे कसं घडलं? जाणून घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

फ्लोरिडा (अमेरिका): गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू जगभरात थैमान घालताना दिसत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे दैनंदिन जीवन, व्यापार व्यवसाय, नोकरी-धंदा सारं काही कासवाच्या गतीने सुरू आहे. कोरोना विषाणूबाबत आणि आजाराबाबत दररोज विविध माहिती आणि नवनवीन संशोधन समोर येत आहे. तशातच कोरोनाच्या या संकटकाळात शरिरात अँटीबॉडी असलेल्या पहिल्या बाळाचा जन्म अमेरिकेत झाला आहे. एका महिलेने जन्म दिलेल्या मुलीमध्ये अँटीबॉडीज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महिला गरोदर असताना तिने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यामुळे या नवजात बालकामध्ये अँटीबॉडीज असल्याचं आढळलं आहे. परंतु, अशाप्रकारची ही वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच केस असल्याने या अँटीबॉडीज नवजात बालकामध्ये कशापद्धतीने काम करतात तो संशोधनाचा विषय असणार आहे.

ऐकावं ते नवलच! RTOचा अजब नियम ऐकून ट्रक ड्रायवर चक्रावला

ज्या नवजात मुलीच्या शरिरात अँटीबॉडीज असल्याचे दिसून आले, तिच्या आईने ३६ महिन्यांची गर्भवती असताना मॉडर्ना लसीचा डोस घेतला होता. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांनी या महिलेने बाळाला जन्म दिला. महिलेने ज्या मुलीला जन्म दिला ती सुखरूप आहे. बाळाच्या जन्मानंतर घेण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली असता नवजात बालकाच्या शरीरात अँटीबॉडी असल्याचं निष्पन्न झालं.

मुंबईतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेतील फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या संशोधन समितीतील दोन बालचिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर पॉल गिलबर्ट आणि चाड रुडनिक यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं की आईने घेतलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मार्फत गर्भात असलेल्या बाळाच्या शरीरात अँटीबॉडीज ट्रान्सफर होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. सध्या या नवजात बालकाला ती महिला विशेष पद्धतीने स्तनपान करत आहे. या महिलेला लसीच्या प्रोटोकॉलनुसार २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोसही देण्यात आला आहे.

loading image