Video : गर्भवतीसोबत अपप्रकार; खांद्यावर मुलाला बसवून 3 किमीपर्यंत अनवाणी चालवलं

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

या महिलेच्या खांद्यावर एका मुलाला बसवून तब्बल तीन किलोमीटर अंतर अनवाणी पावलांनी कच्च्या रस्त्यावर चालवलं गेलं आहे.

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील गुनामध्ये एका गर्भवती महिलेसोबत गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या खांद्यावर एका मुलाला बसवून तब्बल तीन किलोमीटर अंतर अनवाणी पावलांनी कच्च्या रस्त्यावर चालवलं गेलं आहे. पतीने सोडून दिल्यानंतर ही महिला दुसऱ्या एका व्यक्तीसोबत राहत होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या सासरच्या लोकांनी या महिलेला ही शिक्षा दिली. या शिक्षेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे तसेच तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

या प्रकरणाबाबत स्थानिक पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, गुनातील एका गावामध्ये एका महिलेसोबत दुष्कर्म घडले आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काल 15 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.  ही गर्भवती महिला गुनातील बांसखेडी गावची रहिवासी आहे. पीडितेने सांगितलं की दोन महिन्यांपूर्वी पती सीतारामने तिला सांगई गावात डेमाच्या घरी (ज्याच्यासोबत महिला राहत होती) सोडून इंदोरला गेला. पतीने जाताना म्हटलं होती की मी आता तुला ठेवू शकत नाही. तू डेमासोबतच रहा. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिला परत घरी येण्यास सांगितलं. जेंव्हा तिने यास नकार दिला तेंव्हा तिला मारहाण करण्यात आली. 

हेही वाचा - Corona : नवी रुग्णसंख्या 10 हजारच्या आत; गेल्या 24 तासांत 81 रुग्णांचा मृत्यू

पुढे तिने म्हटलंय की, माझ्या खांद्यावर गावातील एका मुलाला बसवलं गेलं आणि सांगईपासून बांसखेडीपर्यंत तीन किमीपर्यंत अनवाणी चालवण्यात आलं. माझ्या पोटात पाच महिन्यांचं बाळ आहे. तरीही सासरच्या लोकांनी मला जबरदस्ती ही शिक्षा दिली. काठी, दगड आणि क्रिकेटच्या बॅटने मला ते मारत राहिले. यादरम्यान पतीने फोन करुन सासरच्या लोकांना मला सोडण्यासीही सांगितले मात्र त्याचंही ऐकण्यात आलं नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman in Guna made walk while carrying a boy on shoulders

Tags
टॉपिकस
Topic Tags: