युवतीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Friday, 11 September 2020

एका युवतीने मॉलमधील तिसऱया मजल्यावरून खाली उडी मारली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने युवती बचावली आहे.

इंदूर (मध्य प्रदेश) : एका युवतीने मॉलमधील तिसऱया मजल्यावरून खाली उडी मारली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने युवती बचावली आहे.

माणूसकीचे दर्शन घडविणारा व्हिडिओ व्हायरल...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील C-21 मॉलमध्ये ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच या युवतीच्या नवऱयाचा अपघातात मृत्यू झाला आहे. नवरा गेल्याचा तिला मोठा धक्का बसला होता. घरामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे तिचे आई-वडील तिला घ्यायला आले होते. तिला सोबत घेऊन ते फरीदाबादला जायला निघाले होते. विमानतळावर जाण्यापूर्वी ते ज्यूस पिण्यासाठी एका मॉलमध्ये गेले होते. मात्र, ज्युस पिता पिता तिने पळ काढला आणि तिसऱया मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेनंतर गोंधळ निर्माण झाला. उपचारासाठी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने ती बचावली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युवती मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman jump from mall at indore video viral