Crime News : हत्येनंतर पती अन् सासूचे तुकडे; अखेर वर्षभरानंतर 'अशी' झाली गुन्ह्याची उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman kill husband and mom in law with help of lover disposed chopped up body parts guwahati crime news

Crime News : हत्येनंतर पती अन् सासूचे तुकडे; अखेर वर्षभरानंतर 'अशी' झाली गुन्ह्याची उकल

आसाम येथे एका महिलेने दोन मीत्रांच्या मदतीने नवरा आणि सासू या दोघांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोघांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून मेघालय मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हत्या या गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्या. तर पती आणि सासू यांची हत्या केल्यानंतर ते दोघे हरवले असल्याची तक्रार या आरोपी महिलेने पोलिसांत दिली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार महिलाने प्रीयकर आणि त्याचा मित्र अशा दोघांच्या मदतीने पती आणि सासूला संपवले. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर मृतदेह मेघालयातील दऱ्यांमध्ये फेकून देण्यात आले.

तिघे अटकेत

गुवाहाटीचे पोलिस कमिश्नर दिगंता बाराह यांनी सांगितले की, हत्या झालेल्या दोघांची ओळख अमरज्योति डे (आरोपी महिलेचा पती) आणि शंकरी डे (आरोपी महिलेची सासू)अशी पटली आहे. आरोपी महिला बंदना कलिता सहित तीचे दोन मीत्र धनजीत डेका आणि अरुप दास या दोघंना अटक करण्यात आली आहे.

असा झाला उलगडा

पोलिसांनी सांगितले की, बंदनाने जुलै २०२२ मध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली होती. यानंतर नोव्हेंबर २०२२ मृतकांच्या एका नातेवाईकाने गुवाहाटीतील एका पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली. यावेळी हत्या झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर च्या आधारावर तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी बंदनावर संशय घेत चौकशी केली. यानंर बंदनाने दोन्ही हत्यांची कबूली दिली.

पोलिसांनी सांगितले की, बंदनाने २६ जुलै रोजी पतीची हत्या केली. तर दुसऱ्या दिवशी२७ जुलै रोजी मृतदेहाचे तुकडे मेघालयात फेकून दिले. यानंतर १७ ऑगस्ट बंदनाने सासूची देखील हत्या केली आणि १८ ऑगस्ट रोजी मृतदेहाचे तुकडे फेकून दिले.

हत्या केल्यानंतर तीने पोलिसांत दोघे हरवल्याचे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून ती पोलिसांकडून केसबद्दल अपडेट देखील घेत राहिली. दरम्यान आता पोलिसांनी बंदानाच्या जबाबनंतर मृतदेहांचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. तसेच तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हत्येनंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नसल्याचे असे पोलिसांनी सांगितले.