

Woman Minister Husband Controversy Extramarital Affairs Case
esakal
Minister Husband Affair : उत्तराखंडच्या महिला व बालकल्याण मंत्री रेखा आर्या यांनी पती गिरधारी लाल साहू उर्फ पप्पू गिरधारी यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पतीने पहिल्या विवाहाची माहिती लपवून आपली फसवणूक केली, तसेच अन्य महिलेशी संगनमत करून आपल्याला जिवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून देहरादूनमधील कँट कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.