

Widow Runs Barefoot in Saree for Home Guard Recruitment Test
Esakal
पतीच्या निधनानंतर दोन चिमुकल्यांसह कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेनं होमगार्ड भरतीसाठी मैदानी चाचणी दिली. यात १६०० मीटर धावण्याच्या चाचणीवेळी साडी नेसून आणि अनवाणी पायाने त्या धावल्या. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील या महिलेचं नाव कविता कुमारी असं आहे. कडक उन्हात पायात काहीच न घालता फक्त ६ मिनिटात त्यांनी हे अंतर पार केलं. कविता कुमारी यांच्या जिद्दीचं कौतुक केलं जात आहे.