esakal | 'पती भांडत नाही, मला वेगळं व्हायचंय'; महिलेची अजब तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

woman seeks divorce over loving husband says he never fights

केवळ 18 महिन्यांत या महिलेनं तलाकची मागणी केलीय. शरिया कोर्टात तिनं ही मागणी केली. तिच्या या मागणीनंतर मौलवीही चक्रावले आहेत.

'पती भांडत नाही, मला वेगळं व्हायचंय'; महिलेची अजब तक्रार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Talak News : पती-पत्नीमध्ये वाद होणं काही नवीन नाही. तो वाद कोर्टात जाणं यातही फारसं काही नवीन नाही. पण, पती फक्त प्रेम करतो. तो माझ्याशी भांडत नाही, अशी तक्रार जर एखाद्या महिलेनं केली तर त्याला काय म्हणावं? होय अशी तक्रार झालीय आणि या कारणावरून संबंधित महिलेनं घटस्फोटही मागितलाय. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका महिलेने अशी तक्रार केल्याची घटना घडली होती. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मौलवींनी नाकारला तलाक 
घटना उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh News संबळ जिल्ह्यातील आहे. एका महिलेनं पतीकडे तलाकची मागणी केलीय. त्या महिलेचं असं म्हणणं होतं की, माझा पती माझ्यावर अति प्रेम करतो. तो माझ्याशी कधीच भांडत नाही. विशेष म्हणजे, लग्नानंतर केवळ 18 महिन्यांत या महिलेनं तलाकची मागणी केलीय. शरिया कोर्टात तिनं ही मागणी केली. तिच्या या मागणीनंतर मौलवीही चक्रावले आहेत. त्यानंतर मौलवींनी तिची तक्रार तलाक देण्यासाठी योग्य नाही, असं सांगत संबंधित महिला आणि पतीला माघारी पाठवले. शरिया कोर्टात तलाक मिळू न शकल्यानं संबंधित महिलेनं गावच्या पंचायतीमध्ये दाद मागितली. पंचायतीनं विशेष बैठक बोलवून त्यावर चर्चा केली आणि शेवटी हा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळं संबंधित महिलेला तिथंही दाद मिळालं नाही. या संदर्भात नवभारत टाइम्सने सविस्तर वृत्त दिले आहे.

विदेशातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्नी म्हणते घुसमट होतेय
या संदर्भात मौलवींनी माहिती दिली. ते म्हणाले, 'संबंधित महिलेची तक्रार ऐकून आम्ही चक्रावलो. ती म्हणाली, पतीचे एवढे प्रेम मी पचवू शकत नाही. पती कधीही माझ्यावर ओरडला नाही आणि त्यानं मला कोणत्याही विषयावर नाराज केलं नाही. यात माझी घुसमट होत आहे. कधी कधी तो माझ्यासाठी जेवण बनवतो. घरातलं कामही करतो. मी त्याला जे सांगते ते तो ऐकतो. अशा वातवरणात माझी घुसमट होत आहे.'  लग्नानंतर 18 महिन्यांत पतीसोबत एकदाही वाद झाला नाही, असं सांगताना संबंधित महिला म्हणाली, 'मी जेव्हा जेव्हा चूक करते तेव्हा तो मला पटकन माफ करतो. मला त्याच्यासोबत वाद घालायचा असतो. पण, तो हसत हसत माझं सगळं ऐकून घेतो. उलट उत्तर देत नाही. माझा पती माझ्या प्रत्येक मताशी सहमत होईल, असं आयुष्य मला जगायचं नाहीय.'

loading image
go to top