प्रियकरासोबत पळून गेली बहीण, पोलिसांनी शोधताच त्यांच्यासमोरच सख्ख्या भावांनी डोक्यात गोळ्या झाडल्या

Crime News प्रियकरासोबत पळून गेलेल्या बहिणीवर तिच्या सख्ख्या भावांनी पोलिसांसमोर गोळीबार केला. तरुणी पोलीसांच्या ताब्यात असताना घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली. आरोपी भावांचा शोध घेतला जात आहे.
Crime Shock Brothers Open Fire on Sister Before Police Investigation On

Crime Shock Brothers Open Fire on Sister Before Police Investigation On

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशात सहारनपूर इथं एक खळबळजनक घटना घडलीय. प्रियकरासोबत पळून गेलेल्या बहिणीवर तिच्या सख्ख्या भावांनी पोलिसांसमोर गोळीबार केला. तरुणी पोलीसांच्या ताब्यात असताना घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून आरोपी भावांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आरोपींनी युवतीवर तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तिच्या डोक्यात अडकली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com