फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या महिलेला रस्त्यावर राहण्याची वेळ; भावुक करणारा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या महिलेला रस्त्यावर राहण्याची वेळ

Video : फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या महिलेला रस्त्यावर राहण्याची वेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : जगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कौशल्य असते गरज असते ती फक्त ती योग्यप्रकारे ओळखण्याची. रोज सोशल मिडियावर अशा एका पेक्षा एक लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही लोकांचे कौशल्य पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिला रस्त्यावर बसली असून उत्तम इंग्रजी बोलताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बनारसमधील आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत आहे त्यामधील महिला सांगत आहे की, दक्षिण भारतामध्ये तिने कॉप्युटर सायन्सपर्यंत (Computer Science) शिक्षण घेतले आहे. या महिलेचे नाव स्वाती असू ती बनारसमधील अस्सी घाटवर राहते. स्वातीच्या (Swati) शरीराचे डावा भाग पॅरलाईज्ड आहे. आपले पोट भरण्यासाठी ती भीख मागते. त्यांच्या हा व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर कित्येक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडिओ जेव्हापासून फेसबुकवर पोस्ट केला आहे, तेव्हापासून व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 50 हजार पेक्षा जास्त व्ह्य़ुज मिळत आहे. स्वाती व्हिडिओमध्ये सांगत आहे की,आयुष्यात काहीही नीट होत नव्हते. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या शरीराचा डावाभागाला पॅरलाईझ्ड झाला. त्यानंतर त्यांना रस्त्यावर राहावे लागत आहे.

सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये स्वाती सांगतेय की, कित्येक लोक सांगतात की ती मानसिक दृष्ट्या आजारी आहे. पण ति, असे आजिबात नाही सांगतेय कारण तीला व्यवस्थित कॉप्युटर चालवता येतो. या व्हिडिओमध्ये स्वातीने तिची इच्छा देखील सांगितली की, तिला नोकरी मिळाली तर ती तिचे आयुष्य चांगले बनवू शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरस झाला आहे.

loading image
go to top