Agrahara Jail : माजी मंत्री रेवण्णांची न्यायालयीन कोठडीतून सुटका; अनेक अटींसह जामीन मंजूर

माजी मंत्री एच. डी. रेवण्णा (H. D. Revanna) यांची काल न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली.
Women Abuse Case HD Revanna
Women Abuse Case HD Revannaesakal
Summary

रेवण्णाचे वकील सी. व्ही. नागेश यांनी त्यांनी कोणालाही धमकी दिली नसल्याचा जोरदार युक्तिवाद केला होता.

बंगळूर : एका महिलेच्या अपहरण प्रकरणात (Women Abuse Case) न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केल्यानंतर माजी मंत्री एच. डी. रेवण्णा (H. D. Revanna) यांची काल न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली. सकाळी रेवण्णांच्या वकिलाने परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृह (Agrahara Central Jail) अधिकाऱ्यांना आदेशाची प्रत दिली आणि जामिनाच्या अटी पूर्ण केल्यानंतर रेवण्णाची सुटका करण्यात आली.

Women Abuse Case HD Revanna
बंगळुरात तब्बल 2.74 कोटींचे ड्रग्ज जप्त; तीन परदेशी नागरिकांसह 8 जणांना अटक, CCB पोलिसांची कारवाई

यामुळे रेवण्णांचा सहा दिवसांचा तुरुंगवास संपला. महिला अपहरणप्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने रेवण्णा यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात आपण निरपराध असून, काहीही चुकीचे केले नसल्याचे रेवण्णा यांनी सांगितले. त्यांच्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नाही.

Women Abuse Case HD Revanna
Ghatkopar Hoarding Collapse : रत्नागिरीत 200 होर्डिंग्जना नोटिसा; घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिकेनं उचललं मोठं पाऊल

रेवण्णाचे वकील सी. व्ही. नागेश यांनी त्यांनी कोणालाही धमकी दिली नसल्याचा जोरदार युक्तिवाद केला होता. एसआयटीतर्फे सरकार समर्थक विशेष अभियोक्ता जोयना कोठारी आणि अशोक नाईक यांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोमवारी रेवण्णा यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com