Ghatkopar Hoarding Collapse : रत्नागिरीत 200 होर्डिंग्जना नोटिसा; घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिकेनं उचललं मोठं पाऊल

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला.
Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapseesakal
Summary

घाटकोपरच्या घटनेनंतर तत्काळ मालमत्ता विभागाने पावसाळ्यापूर्वी या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

रत्नागिरी : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची रत्नागिरी पालिका (Ratnagiri Municipality) प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील २०० अधिकृत होल्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करून त्याचा अहवाल देण्याची नोटीस मालकांना बजावली आहे. पालिकेच्या अभियंत्यांकडूनही त्याची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील होर्डिंग्ज आता पालिकेच्या रडारवर आहेत.

Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर (Ghatkopar Hoarding Collapse) राज्यभरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. वादळ किंवा अन्य आपत्तीने अशा प्रकारचे होर्डिंग किंवा कुठलेही बांधकाम पडू शकते. त्यामुळे त्याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्तकालीन विभागाचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राज्यभरातील शहरांमध्ये होर्डिंग संस्कृती वाढत आहे.

यातूनच होर्डिंग स्पर्धा होताना प्रकर्षाने दिसून येते. शहरातही अलिकडे नाक्या-नाक्यांवर होर्डिंग उभे राहत आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता शहरात २०० अधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेली आहेत. त्या उभारणीच्या परवानगीसाठी संबधितांनी प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठेही अनधिकृत होर्डिंग नसल्याचे पालिकेने सांगितले.

Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाला लागली आग, तब्बल ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच

दृष्टिक्षेपात

  • वर्षाला १८ लाखांचे उत्पन्न

  • शहरात १० बाय २० होर्डिंग

  • अनधिकृत नसल्याचा दावा

उतरवा; अन्यथा दुरुस्ती करा

घाटकोपरच्या घटनेनंतर तत्काळ मालमत्ता विभागाने पावसाळ्यापूर्वी या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत संबंधितांकडून तातडीने ऑडिटचा अहवाल मागविण्यात आला आहे. धोकादायक असलेले होर्डिंग तत्काळ काढा किंवा त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com