Women Agniveers : महिला अग्निवीरांचाही भारतीय वायुसेनेत समावेश करणार; विवेक चौधरींची मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Ram Chaudhary

भारतीय वायुसेनेनं अग्निवीर योजनेंतर्गत महिला उमेदवारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय.

Women Agniveers : महिला अग्निवीरांचाही भारतीय वायुसेनेत समावेश करणार; विवेक चौधरींची मोठी घोषणा

Women Agniveers : हवाई दलाच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त चंदीगडमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Vivek Ram Chaudhary) यांनी हवाई दलातील (Air Force) महिला अग्निवीरांबाबत एक महत्त्वाची घोषणा केलीय.

पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचाही समावेश करण्याचा आमचा विचार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विवेक चौधरी म्हणाले, 'भारतीय वायुसेनेनं वायुसेना अग्निवीर योजनेंतर्गत (Air Force Agniveer) महिला उमेदवारांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या वर्षीपासून महिला अग्निवीरांना सहभागी करून घेण्याचाही आमचा विचार आहे.'

हेही वाचा: ATS-ICG ची समुद्रात मोठी कारवाई; पाकिस्तानी बोटीतून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त, 6 जणांना अटक

ते पुढं म्हणाले, अग्निपथ योजनेच्या माध्यमातून हवाई दलात वायू वॉरियर्सचा समावेश करणं हे आपल्या सर्वांसाठी आव्हान आहे. पण, त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील तरुणांच्या क्षमतेचा उपयोग करून ते देशसेवेत घालवण्याची ही आपल्यासाठी एक संधी आहे. आम्ही आमच्या ऑपरेशनल ट्रेनिंग पद्धतीत बदल केला असून प्रत्येक अग्निवीर भारतीय हवाई दलात करिअर सुरू करण्यासाठी योग्य कौशल्ये आणि ज्ञानानं सुसज्ज असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Shiv Sena : शिवसेना संकटात असताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही युतीसाठी..

या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही 3000 अग्निवीरांची भरती करणार असून पुरेसा कर्मचारी वर्ग मिळावा, यासाठी येत्या काही वर्षांत ही संख्या वाढवली जाणार आहे. याआधी शुक्रवारी विवेक राम चौधरी म्हटलं होतं की, 'अग्निपथ या नवीन योजनेअंतर्गत एअरमनची भरती प्रक्रिया सुरू असून येत्या डिसेंबरमध्ये तीन हजार अग्निवीर हवाई दलात सामील होतील. पुढील वर्षी महिला अग्निवीरांचीही भरती केली जाणार असून सुरुवातीला ही संख्या 10 टक्के असणार आहे.'

हेही वाचा: Bus Accident : बसमध्ये आगडोंब, प्रवाशांचा होरपळून मृत्यू; नाशकातील दुर्घटनेचे थरकाप उडवणारे Photo

टॅग्स :Indian Air ForceAir Force