Shiv Sena : शिवसेना संकटात असताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही युतीसाठी..

उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव स्वीकारणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Prakash Ambedkar Uddhav Thackeray
Prakash Ambedkar Uddhav Thackerayesakal
Summary

उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव स्वीकारणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

जालना : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठी गळती लागलीय. एकीकडं पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे झटताना दिसत आहे. तर, दुसरीकडं शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.

सध्या शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू असून पक्षात प्रवेशही होत आहेत. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) संकटात असताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी (Congress) युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकरांनी शुक्रवारी केला.

Prakash Ambedkar Uddhav Thackeray
Akola : आठवलेंच्या 'त्या' वक्तव्याची प्रकाश आंबेडकरांनी इज्जतच काढली; म्हणाले, काही महाभाग..

राष्ट्रवादीशी युती करण्यास आमची का तयारी नाही हे योग्य वेळी सांगू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते जालना इथं आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाहीय. त्यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने निवडणुकांसाठी आम्ही आमची तयारी करीत आहोत. युतीसाठी आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना आणि काँग्रेसकडं निरोप पाठविला असून आता काय करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव स्वीकारणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Prakash Ambedkar Uddhav Thackeray
Nagpur : प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा; मोहन भागवतांचं मोठं विधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com