esakal | मासिक पाळीत स्वयंपाक करणाऱ्या महिलांबाबत स्वामींचे वक्तव्य; म्हणाले...

बोलून बातमी शोधा

मासिक पाळीत स्वयंपाक करणाऱ्या महिलांबाबत स्वामींचे वक्तव्य; म्हणाले...

- पुढचा जन्म मिळेल कुत्रीचा.

मासिक पाळीत स्वयंपाक करणाऱ्या महिलांबाबत स्वामींचे वक्तव्य; म्हणाले...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

राजकोट : मासिक पाळीच्या काळात एखाद्या महिलेने पतीसाठी स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल आणि अशा महिलेच्या हातचे खाणारा पुरुष पुढच्या जन्मी बैल होईल, असे वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुजरातच्या भूजमधील स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी हे वक्तव्य केले. स्वामी कृष्णस्वरुप दासजी भूजमधील स्वामीनारायण मंदिराचे उपदेशक आहेत. त्यांच्या अनुयायांना संबोधित करताना त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलेनं स्वयंपाक केल्यास ती पुढल्या जन्मी कुत्री होईल. तर अशा महिलेच्या हातचं जेवणाऱ्याला पुढील जन्म बैलाचा मिळेल.

2015 मध्ये सुरु केलेली गुगलची सेवा अखेर बंद

याबाबतचे वृत्त अहमदाबाद मिररने दिले आहे. ते म्हणाले, मासिक पाळी आलेल्या महिलांनी तयार केलेले अन्न खाणे पुरुषांनी टाळावे. तुम्ही अशा महिलांच्या हातचे खात असाल, तर त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. कारण शास्त्रात याबद्दल अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.