Government Scheme : 'नारी शक्ती योजने' अंतर्गत महिलांना 2.20 लाख? जाणून घ्या फॅक्ट

देशातील महिलांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते.
Government Scheme
Government SchemeSakal

Central Government Scheme : देशातील महिलांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका योजनेबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Government Scheme
PIB फॅक्ट चेक : 15000 रुपये अन् सरकारी नोकरी; जाणून घ्या, संपूर्ण सत्य?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मोदी सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नवीन योजना सुरू केल्याचा दावा केला जात असून, 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजना' (पीएम नारी शक्ती योजना) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक महिलेला 2.20 लाख रुपयांची आर्थिक मदत देत आहे. महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

'इंडियन जॉब' नावाच्या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यात केंद्र सरकार दरमहा प्रत्येक महिलेला 2.20 लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा सांगितले जात आहे.

Government Scheme
Government Schemes For Girl Child : तुमच्या लाडक्या परीचे भविष्य उज्वल करणाऱ्या सरकारी योजना

नेमकं सत्य काय?

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी पीआयबीने फॅक्ट चेक केले असता. केंद्रातील मोदी सरकारने 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजना' नावाची कोणतीही योजना सुरू केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे सांगितले आहे.

खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

गेल्या अनेक दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून किंवा बनावट योजनांच्या माध्यमातून भामटे सामान्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे. तसेच एखाद्या योजनेसंदर्भातील मेसेज तुमच्याकडे आला असेल तर, त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी नागरिक https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट देवू शकता. तसेच व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com