इंटरनेट वापरात महिला मागेच; वाचा कोणते राज्य आहे आघाडीवर? \ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Internet Users In India

Internet Users : इंटरनेट वापरात महिला मागेच; वाचा कोणते राज्य आहे आघाडीवर?

इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ग्रामीण भारतातील महिला इंटरनेट युजर्सची संख्या आणखी कमी आहे. ऑक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतात महिला अजूनही इंटरनेट वापरात खूप मागे आहेत. भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी फक्त एक तृतीयांश महिला आहेत.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

'इंडिया इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2022: डिजिटल डिव्हाइड' नुसार भारतीय महिलांकडे मोबाईल फोन असण्याची शक्यता 15 टक्के कमी आणि पुरुषांच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट सेवा वापरण्याची शक्यता 33 टक्के कमी आहे.

या अहवालात ग्रामीण-शहरी भागातील इंटरनेट वापरकर्त्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, देशात वर्षभरात इंटरनेटमध्ये 13 टक्के वाढ नोंदवूनही, शहरी भागांतील 67 टक्के लोकांच्या तुलनेत केवळ 31 टक्के ग्रामीण लोकसंख्येकडे इंटरनेटचा वापर होतो. हा अहवाल जानेवारी 2018 ते डिसेंबर 2021 या कालावधीत केलेल्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)चा प्राथमिक डेटा सांगतो.

हेही वाचा: World Bank : जगभरात भारताचा डंका; 'या' बाबतीत चीनलाही टाकले मागे

राज्यांमध्ये, महाराष्ट्रात सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत, त्यानंतर गोवा आणि केरळचा नंबर आहे, तर बिहार हे सर्वात कमी इंटरनेट वापरणारे राज्य आहे. त्यानंतर छत्तीसगड आणि झारखंडचा नंबर येतो. असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :IndiawomenusersInternet