World Bank : जगभरात भारताचा डंका; 'या' बाबतीत चीनलाही टाकले मागे

भारत, चीन, मेक्सिको, फिलीपिन्स आणि इजिप्त हे देश टॉप पाच मध्ये आहेत.
World Bank
World Banksakal

जगातील अनेक देशांमध्ये भारतीय लोक काम करत असतात. त्यांनी कमावलेला काही भाग भारतातील त्यांच्या कुटुंबियांना पाठवता असतात. दरवर्षी इतर देशांमध्ये काम करणारे भारतीय हजारो कोटी रुपये आपल्या देशात पाठवतात. 2022 मध्येही परदेशात गेलेल्या भारतीयांनी भारतात विक्रमी पैसे पाठवले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत, या वर्षी भारताने सुमारे 12 टक्के जास्त पैसे प्राप्त केले आहेत आणि यावर्षी ते 100 अब्ज डॉलर (सुमारे 8 लाख कोटी रुपये) पर्यंत जाऊ शकतात. भारत आता रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश बनला आहे. 2021 मध्ये भारताला 87 अब्ज डॉलरचा रेमिटन्स प्राप्त झाला होता. अशा परकीय रेमिटन्स भारताच्या जीडीपीच्या जवळपास 3 टक्के आहेत.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

जागतिक बँकेकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेमिटन्स मिळवण्यात भारताने मेक्सिको, चीन आणि फिलिपाइन्सला मागे टाकले आहे. भारत, चीन, मेक्सिको, फिलीपिन्स आणि इजिप्त हे देश विदेशातून डॉलरच्या रूपात रेमिटन्स प्राप्त करणारे महत्वाचे पाच देश आहेत. भारताच्या डॉलर रिझर्व्हमध्ये या रेमिटन्सचा मोठा वाटा आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, अगोदर भारतातील अकुशल कामगार कमी उत्पन्न असलेल्या आखाती देशांमध्ये जात असत, आता परदेशात जाणाऱ्या भारतीयांमध्ये चांगले कौशल्य असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे, जे अमेरिका, इंग्लंडसारख्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातात.

World Bank
Fixed Deposit : एफडी काढण्यापासून मोडण्यापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

भारतीयांनी परदेशातून पाठवलेला पैसा हा भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. सरकारला अपेक्षा आहे की भारतात या वर्षात थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ 80 अब्ज डॉलर असेल. पूर्वी आखाती देशांतून जास्त पैसा यायचा. परंतु, 2021 मध्ये आखाती देशांतून पाठवल्या जाणाऱ्या रकमेत घट झाली आणि अमेरिका, इंग्लंड आणि सिंगापूर यांसारख्या देशांतून पाठवल्या जाणाऱ्या रकमेत वाढ झाली. गेल्या वर्षी चीन आणि मेक्सिकोला 53 अब्ज डॉलरचे रेमिटन्स मिळाले. फिलीपिन्सला 36 अब्ज डॉलरचे रेमिटन्स मिळाले. इजिप्तला 33 अब्ज डॉलर्स मिळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com