
रुग्णवाहिका न मिळाल्याने अथवा पैशाअभावी कुटुंबातील व्यक्तीचे मृतदेह कुटुंबप्रमुखाने खांद्यावर वाहून नेल्याचे वृत्त वाचायला मिळते. पण श्रीकाकुलम जिल्ह्यातील कसिबुग्गा पोलिस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक के. सिरीशा यांनी एका बेवारस मृतदेह खांद्यावर उचलून नेला आणि अंत्यसंस्कारासाठी मदत केली.
हैदराबाद - रुग्णवाहिका न मिळाल्याने अथवा पैशाअभावी कुटुंबातील व्यक्तीचे मृतदेह कुटुंबप्रमुखाने खांद्यावर वाहून नेल्याचे वृत्त वाचायला मिळते. पण श्रीकाकुलम जिल्ह्यातील कसिबुग्गा पोलिस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक के. सिरीशा यांनी एका बेवारस मृतदेह खांद्यावर उचलून नेला आणि अंत्यसंस्कारासाठी मदत केली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक गौतम सवांग यांनी सिरीशा यांनी दाखविलेल्या या मानवतेचे कौतुक केले आहे. अडावीकोट्टूर या आदिवासी भागात एक बेवारस मृतदेह दोन दिवसांपासून पडून होता. त्याबद्दल तेथील सरपंचांना कळाल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हा भाग आदिवासी असल्याने तेथे चांगले रस्ते व वाहतुकीची साधनेही नाहीत. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक सिरीशा यांनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदतनिसांसह मृतदेह सुमारे दोन किलोमीटरपर्यंत खांद्यावर वाहिला. एवढेच नाही तर संबंधित मृत व्यक्तिवर अंत्यसंस्कार करण्यासही त्यांनी मदत केली.
Edited By - Prashant Patil