Women Empowerment : महत्त्वाच्या सर्वच पदांची सूत्रे ‘नारीशक्ती’कडे; हिमाचलातील लाहौल-स्पिती जिल्ह्याचा महिला सक्षमीकरणाचा आदर्श
Himachal Pride : हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात प्रशासनातील महत्त्वाची सर्व पदे महिलांकडे असून हा महिला सक्षमीकरणाचा आदर्श बनला आहे. आयएएस अधिकारी किरण भडाना या जिल्ह्याच्या पहिल्या महिला उपायुक्त ठरल्या आहेत.
सिमला : जगभरात विविध क्षेत्रांत महिला पुरुषांच्या बरोबरीने आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवत आहेत. आपल्या देशातील महिलाही यात मागे नाहीत. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती या जिल्ह्यात प्रशासनातील सर्वच प्रमुख पदांवर महिला अधिकारी काम करत आहेत.