Women's Reservation: फेररचनेतून लोकसभेचा ‘विस्तार’ ,मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी , लोकसभा-विधानसभा जागांत ५० टक्के वाढ

Women Reservation Bill: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लोकसभा आणि विधानसभांमधील जागा वाढवण्याच्या सुधारित घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; २०५१ पर्यंत राज्यांचे प्रतिनिधित्व कायम ठेवण्याचा प्रस्ताव.
The Union Cabinet approves the draft constitutional amendment bill linked to women's reservation and the proposed expansion of Lok Sabha seats.

The Union Cabinet approves the draft constitutional amendment bill linked to women's reservation and the proposed expansion of Lok Sabha seats.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मतदारसंघ फेररचनेद्वारे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील जागा ५० टक्क्यांनी वाढविण्याच्या सुधारित घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. यातील तरतुदीनुसार सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांमध्ये समान प्रमाणात वाढ केली जाणार असून, प्रत्येक राज्याचा लोकसभेतील सध्याचा प्रमाणातील हिस्सा २०५१ पर्यंत कायम ठेवला जाणार आहे. हे विधेयक सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनामध्ये सुरुवातीला लोकसभेमध्ये आणि नंतर राज्यसभेमध्ये मांडले जाणार आहे.

Loading content, please wait...