

Delimitation Bill 2026 Fails in Lok Sabha Vote
esakal
नवी दिल्ली : संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाची तरतूद करणारे १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाही. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मतदानात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित तीन विधेयकांना केवळ २९८ मते बाजूने मिळाली. या अपयशाने देशातील ५० टक्के जनतेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.