
...अखेर 'त्या' जखमीच्या पत्नीला सिद्धरामय्यांच्या समर्थकांकडून मदत
बंगळूर : काल कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील केरूर येथे झालेल्या झालेल्या हिंसाचारात काही लोक जखमी झाले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जखमींना प्रत्येकी दोन लाखांची मदत केली होती. जखमी झालेल्या मोहम्मद हनिफ यांच्या संतप्त पत्नीने काल माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर पैसे फेकले होते. या घटनेनंतर सिद्धरामय्या यांच्या समर्थकांकडून आज मोहम्मद हनिफ यांच्या पत्नीला मदत म्हणून अडीच लाख रूपये मिळाले आहेत.
(Karnataka Women Threw Money On Former Cm Siddhramaiya)
दरम्यान, बागलकोट जिल्ह्यातील केरूर शहरात छेडछाडीच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जखमींना दोन लाखांची मदत जाहीर केली होती. यानंतर ते बागलकोट येथे उपचार घेत असलेल्या जखमींना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी जखमी मोहम्मद हनिफ यांच्या पत्नीने मदत म्हणून दिलेले दोन लाख मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर फेकले होते.
हेही वाचा: गोव्यात काँग्रेसचे सावध पावलं; पक्षाशी प्रामाणिक आमदारांची चेन्नईला रवानगी
जखमीच्या पत्नींचा संताप पाहून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी आज त्या महिलेला अडीच लाख रूपये दिले आहेत. यानंतर त्या महिलेने कालच्या घटनेबद्दल माफी मागितली असून आम्हाला शांतता हवी आहे असं सांगितलं आहे. तसंच हिंसाचारातल्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महिलेने केली आहे.
काय आहे प्रकरण?
एका जखमींच्या पत्नीने जखमींना भेटायला आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या गाडीचा ताफा अडवला होता. त्यावेळी या मुस्लिम महिलेने त्यांना पैसे परत घेण्याची मागणी केली पण सिद्धरामय्या यांनी ते अमान्य केलं आणि त्यांचा ताफा पुढे निघाला पण त्या महिलेने त्यांच्या गाडीवर पैसे फेकत त्यांचा निषेध व्यक्त केला होता.
Web Title: Women Threw Money On Siddhramaiya Get 25 Lakh From Supporters
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..