esakal | आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपर्यंत वर्क फ्रॉम होम
sakal

बोलून बातमी शोधा

Work from home relaxations to be extended till July 31: Ravi Shankar Prasad

आयटी कंपन्यांतली कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल (ता. २८) मंगळवारी केली.

आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपर्यंत वर्क फ्रॉम होम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयटी कंपन्यांतली कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल (ता. २८) मंगळवारी केली. आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

Coronavirus : 'या' तारखेपासून भारतात होणार रोज एक लाख टेस्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती

वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. घरुन काम करण्याचे नियम शिथिल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. भारतामधील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रभाव अधिक असल्याने येथील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

loading image