esakal | कंपनीचे अ‍ॅप्स पडले बंद; फेसबुकनं माफी मागत दिलं 'हे' स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

fake facebook

कंपनीचे अ‍ॅप्स पडले बंद; फेसबुकनं माफी मागत दिलं 'हे' स्पष्टीकरण

sakal_logo
By
विनायक होगाडे

तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद पडलंय की काय? अशी अवस्था तुमची झाली असेल. कारण काही वेळापुर्वी तुम्ही तुमचं फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, मात्र ते होत नसेल. कारण ही अडचण काही तुमच्या एकट्याला येत नसून हा संपूर्ण जगातील फेसबुकसंबधित अ‍ॅप्स बंद पडले आहे. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम या अ‍ॅप्सचा समावेश आहे. आज सायंकाळी 9:15 वाजेच्या सुमारास फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन बंद झाले आहे.

याबाबत आता फेसबुकने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्हाला माहिती आहे की काही लोकांना आमच्या अ‍ॅप्स आणि उत्पादने वापरण्यामध्ये अडचणी येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

सुरूवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप वगळता सर्व वेबासाईट्स सुरू असल्याचं दिसून आलं. यानंतर ट्विटर फेसबुक डाऊन, व्हाट्सऍप डाऊन असे ट्रेंड देखील सुरु झाले. यापुर्वी देखील अनेक वेळा काही तांत्रिक अडचणींमुळे फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप बंद झाल्याचे आढळले होते.

व्हाट्सऍपने म्हटलंय की, काहींना सध्या व्हाट्सऍप वापरण्यामध्ये अडचण येत असल्याचं आम्ही जाणून आहोत. परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ.

loading image
go to top