PM Modi : तथागत बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर..; शिखर परिषदेत काय म्हणाले मोदी?

तथागत बुद्धांनी (Tathagata Gautama Buddha) दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर हवामान बदलांसारख्या संकटाचा कधी सामना करावा लागला नसता.
Narendra Modi World Buddhist Summit
Narendra Modi World Buddhist Summitesakal

नवी दिल्ली : गेल्या शतकात काही देशांनी येणार्‍या पिढ्यांबद्दल विचार न केल्यामुळं हवामान बदलांसारखी संकट आली आहेत. लाईफस्टाईलचा प्रभाव देखील वसुंधरेवर पडत आहे. परंतु, आपण ठरवलं तर पृथ्वीला या संकटातून वाचवू शकतो, असं स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केलं.

आज जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेच्‍या (World Buddhist Summit) उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या दोन दिवसीय परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तथागत बुद्धांनी (Tathagata Gautama Buddha) दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर हवामान बदलांसारख्या संकटाचा कधी सामना करावा लागला नसता, असंही मोदी म्हणाले.

Narendra Modi World Buddhist Summit
Karnataka Election : काँग्रेसनं 91 वर्षाच्या वयस्कर उमेदवाराला दिलं तिकीट; शिवशंकरप्पा म्हणाले, मी तगडा घोडा..

मोदी पुढं म्हणाले, प्रत्येक व्यक्ती हवामान बदलाच्या समस्येचा सामना करू शकतो. नागरिकांना जागरुक होवून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रयत्नानं या मोठ्या समस्येला तोंड दिलं जावू शकतं आणि हाच बुद्धाचा मार्ग आहे. जगाला सुखी करायचं असेल तर स्वतःमधून बाहेर पडून जगाची संकुचित विचारसरणी त्यागली पाहिजे. संपूर्णतेचा हा बुद्धानं दिलेला मंत्रच एकमेव मार्ग आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

Narendra Modi World Buddhist Summit
Karnataka Election : गोळीबारात ठार झालेल्या 'अतिक'ची निवडणुकीत एन्ट्री; भाजप नेत्यानं केलाय गंभीर आरोप

‘परियक्ति, पटिपत्ती तसंच पटिवेध’ हा बुद्धाचा मार्ग आहे. गेल्या 9 वर्षात भारत या तीन ही बिंदुंवर वेगानं मार्गक्रमण करत आहे, असंही मोदींनी सांगितलं. या परिषदेत जवळपास 30 देशांचे 171 प्रतिनिधी तसेच भारतीय बौद्ध संघटनेचे 150 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com